जनतेज न्युज

चक्क सरपंच पती निघाला अफु ची शेती करणारा …

प्रतिनिधी , जालना : बदनापूर तालुक्यातील चनेगाव शिवारात अफू (गांजाची) शेती करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्या मार्फत लागल्याने सापडा रचून रात्री उशिरा बदनापूर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक चनेगाव शिवारात गेल्याने तेथे गांजाची (अफू) झाडे एका शेतात आढळून आली ही गांजाची शेती जवळपास एक ते दीड एकरात लावल्याचे समजते
96 किलो 200 ग्राम वजनाची आणि 24 लाख पाचशे रुपयाची ही गांजाची झाडे जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, नायब तहसिलदार संजय शिंदे,दुर्गेश राजपूत, बदनापूर चे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर, फुलचंद हजारे, किशोर जाधव, कृष्णा तेलांग्रे, प्रशांत लोखंडे, रवी जाधव, ए एस आय शेख इब्राहिम,आय जी शेख, शिवानंद काळूसे,विष्णू बुणगे, रणजित मोरे, आशिष दासार आदींनी पार पाडली या प्रकरणी आरोपी अटक असून पुढील तपास ए पी आय एन एन उबाळे करीत आहे
आरोपी निवृत्ती गणेश शेवाळे रा चनेगाव 8 क ,17 क अमली औषध द्रावय मन प्रभावी पदार्थ अधिनियम1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे