जनतेज न्युज

अनैतिक शारिरीक संबंधातून बायको आणि मेव्हणीने केली नव-याची हत्या

प्रतिनिधी , ठाणे : ठाणे पोलिसांनी मुंब्रा येथील अशा एका हत्या प्रकरणाचा छडा लावलाय ज्यामुळे मुंब्र्यात एकच खळबळ उडाली होती… मुंब्रातील मित्तल कम्पाउंड येथे राहणारा अहमद दाऊद शेख याची हत्या करण्यात आली होती. त्याची हत्या कोणी केली याबाबत ठाणे पोलिसांना काही सुगावा हाती लागत नव्हता… म्हणुन त्याच्या फोन काॅलवरुन तपास केला असता हत्येच्या काही वेळा पुर्वी अहमद हा त्याचा मित्र मोहम्मद शफीक शेख याच्याशी फोनवरुन बोलला होता… त्यानुसार पोलिसांनी मोहंमद शफीक शेख याला ताब्यात घेतले असता त्याने अहमदची पत्नी आणि मेव्हणी सोबत अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले आणि त्या वादातून मोहम्मद शफीक शेख, अहमदची पत्नी आणि अहमदची मेव्हणी या तिघांनी मिळून धार धार शस्त्रांनी अहमदची हत्या केल्याचे मोहम्मद शफीक शेख ने पोलिसांनी सांगितले त्यानुसार ठाणे पोलिसांनी तिघांना अटक केलीये…