प्रतिनिधी , पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी लॅपटॉप गायब केल्याची चर्चा केली जात आहे. यामध्ये धनराज भोकरे यांनी हा लॅपटॉप गायब केला असा आरोप शिसेनेचेच्या नगरसेविका संजना चव्हाण यांनी केला. या आरोपानंतर भोकरे हे दोन दिवस कोणाचाही संपर्कात नव्हते, त्यांच्या घरच्यांना पण भेटले नव्हते असं स्पष्टीकरण भोकरेंच्या वडिलांनी दिलेहोते. या सगळ्या आरोपांचे खंडन करत आज माध्यमांसमोर भाजपचे नगरसेवक धनंजय भोकरे यांनी या प्रकाराची माहिती दिली. बजेटच्या कामात मी वस्त होतो घरी जायला मला उशीर होत होता म्हणून माझी घरी भेट होत नसे म्हणून त्यांना कल्पना नव्हती, असं भाजपचे नगरसेवक धनंजय भोकरे म्हणले. मात्र माणुसकीच्या नात्याने मी त्या मुलीला मदत केलेली. घटना घडली त्यावेळी मी पूजा चव्हाणला अॅम्बूलन्समध्ये बसून देऊन त्या महिलेची मदत त्या ठिकाणी मी केली पण मला तिथे कोणताही लॅपटॉप सापडला नाही असा खूलासा धनंजय भोकरे यांनी केला आहे.
