जनतेज न्युज

चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालकांची सरळसेवेने भरती करावी… राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे आंदोलन…

प्रथिनिधी, सोलापूर :

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढून सरकारच्या मनमानी धोरणा विरोधात आंदोलन करण्यात आले.सरकारनं चतुर्थश्रेणी कर्मचारी व वाहनचालकांची सरळ सेवेने भरती करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

14 जानेवारी 2016 रोजी शासन निर्णय पारित करुन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना 25 टक्के वरून 50 टक्के पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली गेली नाही.उलट वर्ग चार ची पदे कमी करण्यात आली.27 एप्रिल 2022 रोजी वित्त विभागाने शासन निर्णय पारित करून यापुढील काळात वाहनचालक व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. याला विरोध म्हणून आज राज्य सरकार चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन करण्यात आले.चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहनचालकांना सरळसेवेने भरती करण्याची मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आलीय.