जनतेज न्युज

चांदवडला श्री.रेणुका माता मंदिर घटस्थापनेपासून उघडणार भाविकांसह , संस्थान कर्मचा:यामध्ये आंनद ; मात्र यात्रोत्सवाबाबत संभ्रम कायम  !  

प्रतिनिधी ,चांदवड –  येथील कुलस्वामिनी श्री. रेणुका मातेचे पुरातन मंदिर असून हजारो वर्षापासून येथे दर नवरात्र उत्सवात यात्र उत्सव भरतो गेल्या वर्षी पासून  कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर मंदिर बंद असल्याने परिसरातील व्यावसाईकांवर बेरोजगारीची कु:हाड कोसळली होती. तर मंदिर संस्थानही कर्मचारी पगार व  इतर व्यवस्थापन खर्चामुळे बेजार झाला होता. सर्वत्र वाईट अवस्था असतांना  कालच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घटस्थापनेपासून  सर्वच मंदिरे उघडण्याची घोषणा केल्याने भाविकासह  संस्थान कर्मचा:यामध्ये आंनदाचे वातावरण असले तरी मात्र यंदा दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमुळे होणारा यात्रउत्सव होईल की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.दरम्यान श्री. रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक एम.के.पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी मात्र यात्रोत्सवास परवानगी मिळेल न मिळेल मात्र लगेच मंदिर परिसरातील स्वच्छता , डागडुजी , मंदिरातील विजेची उपकरणो, पंखे व इतर सर्व कामास वेग घेतल्याचे सांगीतले.तर ब:याच दिवसापासून  कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने मंदिरात प्रवेश करण्यासाठी लावलेले बॅरीकेटींग व परिसरात घाणीचे व धुळीचे साम्राज्य पसरले होते. ते ही स्वच्छ करण्याचे काम सुरु केले शासनाचा मंदिर उघडण्याचा आदेश झाला असला तरी  यात्रउत्सवाबाबत संभ्रम आहे. तर बाहेरगावचे व स्थानिक यात्रेत दुकाने थाटणा:या दुकानदारांनी सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांच्याकडे चौकशी सुरु केली आम्ही यात्रेत बसु शकतो का, यात्र होईल का  असे प्रश्न दिवसभर हे व्यावसाईक विचारत असल्याने शासनाकडून अद्याप यात्रउत्सवाबाबत आदेश नसल्याचे त्यांनी सांगीतले. दरम्यान यंदा मात्र घटस्थापनेपासून मंदिर उघडणार असल्याने नित्याचे कार्यक्रम त्यात श्री. रेणुका मातेचा अभिषेक , पुजा, आरती आदि कार्यक्रम होणार असल्याने घटस्थापनेच्या दृष्टेने सर्व तयार येत्या आठ ते पंधरा दिवसात ऐनवेळी करावी लागणार असल्याने चांदवड श्री.रेणुकादेवी संस्थान व कर्मचा:यांची धावपळ उडाली आहे. तर धर्मिक स्थळाचे स्वरुप बघुन किती भाविकांना  एकाचवेळी आत प्रवेश द्यावचा याचा निर्णय अद्याप स्पष्ट नाही मात्र मंदिर परिसरात थुंकण्यास  मनाई आहे. कोरोनाची लक्षणो नसलेल्या  व्यक्तीनाच मंदिरात प्रवेश राहणार आहे.  धार्मिक  स्थळाचे  स्वरुप बघुन भाविकांना प्रवेश  द्यायचा  यांचा निर्णय अजुन व्हायचा आहे. यासाठी स्थानिक अधिका:यांशी चर्चा केली जाणार आहे.मंदिरात आत प्रवेश करण्याचा मार्ग व आणि बाहेर  पडण्याचा  मार्ग  वेगळा  असावा, भक्तामध्ये  किमान  सहा फुटांचे  अंतर  असावे,  कन्टेन्ट  झोनमधील  मंदिरे बंद राहतील.तर 65 वर्षावरील नागरीक , गरोदर माता आणि दहा वर्षाखालील  बालकांना मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले असले तरी अद्याप यात्रउत्सव होईल की नाही याबाबत सभ्रंम आहेच तर  मात्र कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर भाविकांनी व सर्वानी काळजी घेऊन सहकार्य करावे अन्यथा चांदवड श्री.रेणुका देवी मंदिरात दर्शनास गेलो व कोरोना बाधीत झालो असे करु नये असे आवाहन सुभाष पवार यांनी केले आहे.