महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख,मंत्री अनिल परब जेलमध्ये जाणार, तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाईचा बडगा: किरीट सोमय्या
मुंबई महापालिका भ्रष्टाचार व ठाकरे सरकारचा कोव्हिडं काळातील भ्रष्ट कारभार उघडकीस आणणार: किरीट सोमय्या
प्रतिनिधी ,रायगड : भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री व सरकारच्या कारभाराविरोधात भांडाफोड मोहीम सुरू केली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना युतीवर सोमय्या ने भाष्य केले. महापालिकेचा भ्रष्टाचार असो की ठाकरे सरकारचा कोव्हिडं काळात केलेला भ्रष्टाचार असो बाहेर काढला जाईल, यांच्या विरोधात कारवाई होणारच असे सोमय्या यांनी ठासून सांगितले. घोटाळा आणि महाराष्ट्राला घोटाळामुक्त करणे ही नीती रणनीती होऊ शकत नाही , ही आमची कमिटमेंट आहे. भ्रष्टाचाराचा समझोता होऊच शकत नाही, भ्रष्टाचाचार्यांवर कारवाई होणारच,महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख,मंत्री अनिल परब जेलमध्ये जाणार, तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल असे किरीट सोमय्या म्हणाले. कोल्हापूर येथील मुरगुड नगरपंचायतीने मला जाण्यास बंदी घातली आहे, परवा कोल्हापूर ला जाणार आहे, व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल पोलीस स्थानकात 1)सर सेनापती साखर मिल घोटाळा, 2 )गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना, आणि तिसऱ्या घोटाळ्या बाबत कारवाईसाठी तक्रार देणार आहे, हिम्मत असेल तर ठाकरे व पवार यांनी हिम्मत असेल तर अडवून दाखवा , मी कोल्हापूरला जाणारच असे आव्हान सोमय्याने ठाकरे सरकारला दिले. कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर अटक व मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे , मात्र ठाकरे सरकारने कोणतीही कारवाईची भूमिका घेतलेली नाही, याउलट घोटाळेबाज विवेक पाटील यांना ठाकरे सरकारने रेड कार्पेट ची वागणूक दिली, त्यांच्या बचावाची भूमिका घेतली, ठाकरे सरकार हे विवेक पाटील यांचा सन्मान करणार आहे का असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. रवींद्र वायकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर सव्वाशे कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे, मात्र मुरुड कोर्लई येथील 19 बंगले ज्याची अनेक वर्षे वायकर घरपट्टी भरत होते, आज त्याठिकाणी बंगले नाहीत, ते बंगले कुठे गेले याचे स्पष्टीकरण वायकर यांनी द्यावे अशी मागणी सोमय्या यांनी केली.
