प्रतिनिधी , अमरावती : शेतकऱ्यांवरील अन्याय कारक कायदे तातडीने रद्द करा, त्यापेक्षा शेतकरी हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू करा अशी मागणी असून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने आज ८ डिसेंबर रोजी देशव्यापी बंद असतांना चांदूर रेल्वे तालुका सुद्धा कडकडीत बंद ठेवण्यात आला. यामध्ये आम आदमी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय कम्युनिष्ट पार्टी, मार्क्सवादी पार्टी, जनता दल (सेक्युलर), प्रहार संघटना, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रगतशील लेखक संघ आदी पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या.
अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वेत हात जोडून दुकाने बंद करण्याची विनंती करण्यात आली व याला नागरिकांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
