प्रथिनिधी, जळगाव : एसटी महामंडळ 74 वर्षे पूर्ण होऊन 75 व्या वर्षात पदार्पण होत असल्याने आज 1 जून रोजी चोपडा आगारात चोपडा बदलापूर रात राणी बसला सजवून एसटी बस ची ओटी एसटी महामंडळातील महिला कर्मचारी व प्रवासी महिला यांच्या हस्ते भरण्यात आली व त्यानंतर प्रवाशांच्या पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरू स्वागत करून एसटीच्या वर्धापन दिवस साजरा करण्यात आला संपूर्ण एसटी आगाराला केळीच्या खांब व रांगोळ्यां टाकून सजविण्यात आले होते सदर कार्यक्रमाला ए टी पवार एस जी चावरे अनिल बाविस्कर श्रीकांत नेवे एस डी साळुंखे डी ए बि-हाडे संदीप तायडे एस पी मराठे यांच्यासह चोपडा एसटी आगारातील कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
