जनतेज न्युज

तीन चोरांकडून पंधरा मोटार सायकली जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

प्रथिनिधी, चंद्रपूर : काही दिवसापासून जिल्हयात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाला चोरांना पकडण्यात अखेर यश आले.चोरी प्रकरणात तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली.एकूण पंधरा मोटार सायकली पोलीसांनी जप्त केल्या आहेत. प्रदीप संजय शेरकूरे ,विजय शंकर देवगडे , राजेंद्र नानाजी काळे,रोषण अशोक गोबाडे, विपुल प्रभाकर मेश्राम अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अरवींद साळवे , अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे , पोलीस निरीक्षक यांनी केली.