प्रथिनिधी, कल्याण : कल्याण मध्ये महात्मा फुले पोलिसांनी एका बाईक चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत .माधव भामरे अस या चोरट्याचे नाव आहे .त्याच्याकडून चोरी केलेल्या तीन बाईक पोलिसांनी जप्त केल्यात .आणखी बाईक देखील चोरी केल्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी तपास सुरु केला . व्यवसायाने हार विक्रेता असलेल्या माधवला हार विकता विकता मुलींशी बोलायची सवय लागली ,मुलींना आकर्षित करण्यासाठी त्याने महागड्या बाईक चोरून या बाईकवर त्यांना फिरवणे सुरू केले ,नंतर या दुचाक्या विकून हौस मौज करणं सुरू केलं .अशीच एक चोरीची दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या माधवला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे . कल्याण डोंबिवलीत बाईक चोरीचे. प्रमाण वाढल्याने या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले आहे .बाईक चोरीच्या घटनांचा तपास करताना कल्याण महात्मा फुले पोलिसांना एक तरुण चोरीची दुचाकी विकण्यासाठी टिटवाळा गोवेली येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती .या माहितीच्या आधारे या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत माधव भांबरे याला अटक केली .त्याच्या चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेल्या तीन बाईक जप्त केल्यात त्याच्या विरोधात ठाणे मुंबई कल्याण मधील पोलिस ठाण्यात बाईक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे .कल्याण तालुक्यातील खडवली गावात राहणाऱ्या माधव भांबरे हा टिटवाळा गणेश मंदिर परिसरात हार फुले विक्रि करत उदरनिर्वाह करत होता .त्याला मुलींशी बोलण्याची सवय होती मुलींना आकर्षित करण्यासाठी महागड्या बाईक ची कल्पना त्याला सुचली .मात्र तितके पैसे नसल्याने त्याने बाईक चोरी करणे सुरू केले .इतकेच नव्हे तर मुलींना बाईक वर फिरवल्यानंतर तो या बाईक विकून हौस मौज करत असे ..माधव ने आणखी काही बाईक चोरी केल्या असल्याचा संशय पोलिसांना आहे त्यादृष्टिने पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
