जनतेज न्युज

आवास योजनेच्या थकीत निधीसाठी लाभार्थ्यांना घेऊन भाजयुमोची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

प्रथिनिधी, वर्धा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भारतातील प्रत्येक नागरिकांना घर मिळाले पाहिजे यासाठी एक महत्वकांक्षी योजना प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली.वर्धा शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरांना मंजुरी प्राप्त झाली,परंतु राज्य सरकारने केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा Utility Certificate सादर केल्यामुळे प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत वर्धा शहरातील 48 घराचे बांधकाम रखडलेले आहे.राज्य सरकारने या 48 कुटुंबास न्याय द्यावा व प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सुरू असलेले बाधकाम त्वरित पूर्ण करावे या मागणीसाठी आज भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.