प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : मोबाईल चोरीच्या संशयावरुन एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. व्यक्तीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी दोन जणांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.
अनेकदा अशी घटना समोर येते की, कोणाला तरी चोर संशयावरुन बेदम मारहाण केली जाते. अशा घटनांमध्ये काही जणांचा जीव ही जातो. पोलिस कारवाई ही करते. मात्र तरीही या घटना थांबलेल्या नाहीत. कल्याणमध्ये सुद्धा चोरीच्या संशयावरुन मारहाणीमध्ये लोकांचा जीव गेला आहे. काही जण जखमी झाले आहेत. अशीच एक घटना कल्याण पूर्व भागातील कचोरे परिसरात नव्याने घडली. या घटनेट काही तरुणांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली.कैलाश नेवाळे आणि त्याच्या मित्रने मोबाईल चोरी केला असल्याचा स्वंशय घेत आरोपी मारुफ पोके आणि आसिफ शेख या तरुणांनी कैलाश नेवाळे शोधून काढले सायंकाळी कैलाश घरी जात असताना या दोघांनी त्याला बेदाम मारहाण करण्यास सुरवात केली कैलाशने त्यान्हा वारंवार सांगितले की, त्याने चोरी केलेली नाही. तरी देखील या दोघांना त्याला मारहाण करुन रक्त बंबाळ केले. मारहनिची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन
अर्ध मूर्त अवस्थेत असलेल्या कैलाशला उठवून त्याला रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले. मात्र त्याची अवस्था
गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला मुंबईतील शीव रुग्णालयात उपचारा साठी पाठवले . या प्रकरणी टिळकनगर पोलिसानी चोरीच्या संशयावरुन मारहाण करणाऱ्या चार तरुना विरुद्ध गुन्हा दाखल करत मारुफ आणि आसिफला अटक केली आहे. व अन्य दोन आरोपींचा शोध सुरु आहे.
