जनतेज न्युज

जनतेला दिलेला शब्द न पाळल्यामुळे नगरसेवकांची नाराजी भाजपला भवली – एकनाथ खडसे

प्रतिनिधी , जळगाव -गेल्या अडीच वर्षापासून जळगाव महापालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टी च्या ताब्यात होती नगरसेवकांची व जनतेची कामे होत नसल्यामुळे नगरसेवक नाराज झाले आहेत त्यामुळे हे नगरसेवक महाआघाडी मध्ये सामील होत आहे महापालिकेतील असंतुष्ट नगरसेवकांनी शिवसेनेची सोबत करण्याचा निर्णय घेतला असून सेनेसोबत ४५ नगरसेवक असतील अशी माहिती आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. असंतुष्ट नगरसेवकांनी अलीकडेच आपली भेट घेतली असल्याची माहिती देत खडसे यांनी महापालिकेतील सत्ता संघर्षाच्या प्रकरणावर भाष्य केले आहे.