मुंबई- शिवसेनेने गुजराती जनतेला लुभावण्याकरता, जलेबी नी फाफडा उध्दव ठाकरे आपला. अशी घोषणा दिली आहे. शिवसेना कधी गुजरात्यांना शिव्या देते. मोदींचा बाप काढते. अमित शहा यांना मोटाभाई म्हणते, कधी अजान स्पर्धा भरवते. अशी टीका भाजपचे अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेनेला यावेळी पराभवाशिवाय काहीही मिळणार नसल्याचही ते म्हणाले. शिवसेना सगळीकडे खासगीकरण करत असुन उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्र विकायला काढला तर आश्चर्य वाटायला नको. आता जलेबी नी फाफडा जनाब सेनेला आपटा अशी मुंबकरांची घोषना असेल असं आवाहन करत, महाराष्ट्रातील जनता शिवसेनेच्या भुलथापांना बळी पडणार नसुन या वेळी त्यांना धडा शिकवेल असही ते म्हणाले.
