प्रतिनिधी , जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे असलेल्या प्रसिद्ध मंगळग्रह मंदिरात तुळशी विवाह महासोहळा त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सव पारंपारिक पद्धतीने दिवस साजरा करण्यात आला. मंदिर परिसरातून पालखी मिरवणूक काढून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळ ग्रहाची विशेष महापूजा करण्यात आली. मंगळ ग्रह मंदिरातील तुळशी विवाह पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते मात्र यावर्षी कोरोणाच्या च्या प्रादुर्भावामुळे मर्यादित भक्तांमध्ये हा महासोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे तुळशीला साक्षात मधुराणीचे रूप देण्यात आले होते. तर मंगळ देवाला वर राजाच्या रुपात सजविण्यात आले होते.
