प्रतिनिधी , मंगळवेढा : विठ्ठल सहकारी कारखाना अडचणीतून बाहेर काढणे. मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावाचा पाणी प्रश्न मिटवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.
आ. भारत भालके यांच्या निधनानंतर चा तिसऱ्या दिवशी च्या विधीसाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सरकोली ( ता. पंढरपूर) येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या दरम्यान आ. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके व व्यकंटेश भालके यांनी तिसऱ्या दिवशी चे सर्व विधी पार पाडले.
पुढे पाटील म्हणाले, आमदार भारत भालके यांनी अखेरच्या श्वासापर्यंत 35 गावांच्या पाण्यासाठी प्रयत्न केले. पुढील एक वर्षात मंगळावेढ्याला पाणी देण्याची जबाबदारी महाविकास आघाडीचे आहे. कोरोनामुळे सगळ्यात जादा पंढरपूरचे फार मोठे नुकसान झाले आहे. दिग्गज माणसं गेली. उपचारा दरम्यान आ. भालके नागरिकांचे प्रश्न सोडवत होते. शेवटपर्यंत ते विठ्ठल सहकारी साखर कारखाना काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. असे नेते खूप कमी असतात. अशा नेत्याचे निधन झाले यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे फार मोठे
