जनतेज न्युज

तिवसा पोलीस स्टेशनसमोर धावती ट्रॅव्हल्स पेटली.

सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. बस मधील 52 प्रवाशी सुखरूप बाहेर.

प्रतिनिधी , अमरावती : रायपूरवरून सुरतकडे प्रवासी घेवून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने सोमवारी पहाटे 2 वाजताचे सुमारास पेट घेतला.सुदैवाने बसमधील 52 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.सर्व प्रवाशांनी बाहेर पडताच सुटकेचा श्वास घेतला.
सविस्तर असे की,दुपारी 2 वाजताचे सुमारास महेंद्र ट्रॅव्हल्स क्रमांक CG 19,F-0231 ही बस रायपूर वरून प्रवाशी घेवून नागपूर,अमरावती मार्गे सुरत कडे जात होती. दरम्यान नागपूर ते अमरावती हायवेवरील तिवसा पोलीस स्टेशन समोर अचानक या ट्रॅव्हल्स ने पेट घेतला.बसमधील सर्व प्रवाशी गाढ झोपेत असतांना अचानक बसमध्ये धुवा निर्माण झाल्याने ट्रॅव्हल्स पेटल्याचे समजताच बसमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.तेव्हा तात्काळ तिवसा पो स्टे चे नापोको निलेश खंडारे यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले.त्यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता.ट्रॅव्हल्सच्या कंडक्टर साईटचा मागील टायर फुटल्याने धावत्या ट्रॅव्हल्सने पेट घेतल्याचे समजते.सुदैवाने तिवसा पोलीस स्टेशन ला अग्निशमन दलाची गाडी तयार होती.त्या आधारे चार गाड्या पाणी ओतून ही आग विझविण्यात आली.यासाठी तिवसा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पोलीसांनी आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेतले.