प्रतिनिधी , सांगली : हजारो दिव्यांनी सांगलीतील कृष्णा नदी घाट परिसर आज उजळुन निघाला… त्रिपुरा पौर्णिमे निमित्त सांगलीकरानी शहरातील सरकारी घाटा वर एकत्र येऊन दिवे लावून त्रिपुरा पौर्णिमा साजरी केली…यामुळे कृष्णा घाट परिसर दिव्यांच्या रोषणाईने लखलखून गेल होता…..
भगवान श्रीकृष्णाने केलेल्या त्रिपुरासुराच्या वधाचा आनंदोत्सव म्हणून त्रिपुरा पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहेत…. सांगलीत आज मोठ्या उत्साहात ही त्रिपुरा पौर्णिमा साजरी करण्यात आली… सांगलीच्या नदी घाटावर यानिमित्ताने सांगलीकरांनी एकत्र येऊन दिवे प्रज्वलित केले…. शहरातल्या सरकारी घाटावर यावेळी हा दीपोत्सव सोहळा पार पडला…यामुळे संपूर्ण घाट दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता…मोठ्या उत्साहात महिलांनी यावेळी कृष्णाकाठी या त्रिपुरा पूर्णिमाच्या निमित्ताने गर्दी केली होती…
