प्रतिनिधी , जळगाव : स्वच्छतेचा मक्ता यामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत गैरव्यवहार झाल्याचे शिवसेनेचे नगरसेवक मनीष नाईक यांनी माझ्याकडे काही कागदपत्र आणून दिलेली आहेत याची मी शहानिशा करून सरकारकडे तक्रार करणार आहे व नागरिकांना ज्या गैरसोय होत आहेत त्याचीही चौकशी करून मी नागरिकांच्या बाजूने महानगरपालिकेमध्ये आवाज उठवणार आहे अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या ताब्यात असलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत दिली आहे
