प्रतिनिधी, वर्धा : आज जागतिक महिला दिनी आंबेडकरी महिला कार्यकर्त्या व दर्शना महिला बचत गटाने पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने वर्धा शहरातून रॅली काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सिव्हिल लाईन येथे अभिवादन केले. आंबेडकरी नेत्या वैशाली पाटील व वर्धा नगरपालिकेच्या सदस्या पद्माताई रामटेके यांनी अथक परिश्रम करुन रॅलीचे नियोजन करुन जागतिक महिला दिन साजरा केला व साखळी उपोषण केले. यावेळी अनेक महिला या रॅली मध्ये सहभागी झाल्या तसेच यावेळी नारे देण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने या रॅलीचे आयोजन केले होते.
