जनतेज न्युज

जानेवारी ला प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाला चपलांचा हार घालणार : शेतकरी भाई गंगाभीषण थावरे

अमलबजावणी होत नसेल तर बैठका घेऊन काय उपयोग त्यामुळे प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाला चपलांचा हार घालणार असल्याचे शेतकरी भाई गंगा भीषण थावरे म्हणाले

प्रतिनिधि , औरंगाबाद : शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 26 जानेवारीला प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाला चपलांचा हार घालणार असल्याचे शेतकरी भाई गंगा भिषण थावरे म्हणाले.
प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे शेतकरी भाई गंगाभिषण थावरे म्हणाले की 26 जानेवारी रोजी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाला चपलांचा हार घालणार असल्याचे सांगितले आहे.

भाई गंगा भीषण थावरे यांनी प्रमुख मागण्या केल्या आहे की
1)15 दिवसाच्या आत उसाचे बिल मिळाले पाहिजे
2) एफ.आर. पी प्रमाणे पैसे मिळाले पाहिजे
3) गेट किंग चा ऊस बंद झाला पाहिजे
अशा प्रमुख मागण्या शेतकरी भाई गंगाभीषण थावरे यांनी केले आहे.