जनतेज न्युज

जिल्हाधिकारी आज घेणार यवतमाळ लॉकडाउनचा निर्णय ; नागरिकांची बेफीकरी ड्रोन कॅमेऱ्यात शूट

प्रतिनिधी , यवतमाळ : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नुकतेच केंद्रीय पथक येऊन गेले. एका दिवशी तीन हजार चाचण्या करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. पुसद तालुक्यात लॉकडाउन करण्यात आले.
यवतमाळ शहरात एकाच दिवशी 164 पॉझिटिव्ह निघाले. शहरात शंभरपेक्षा जास्त कन्टेन्मेंट झोन आहेत. रात्रीच्या वेळेसही लोक एकत्र येऊन गप्पा करतात. त्यामुळे लॉकडाउन करणे आवश्यक झाले आहे. यासंदर्भात कोअर कमिटीच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. नागरिकांची बेफीकरीचे चित्र उल्हास निनावे यांनी ड्रोन कॅमेऱ्यात शूट केली आहे.