प्रथिनिधी, अकोला : अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी आज बुधवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास जोरदार धुळीच्या वादळाने हजेरी लावली… या वाहणाऱ्या धुळीच्या वादळामुळे अकोल्यातील गांधीग्राम’मध्ये प्रचंड धावपळ झाली. आज गांधीग्रामचा बाजार भरण्याचा दिवस, ऐन बाजाराच्या वेळी धुळीचं वार आल्याने बाजारात येणारे आणि रस्त्यावर थाटणाऱ्या भाजी-पालासह फळ विक्रेत्यांची धावपळ झालीय.. सुदैवाने या धुळीच्या वादळामुळे कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे दिसले नाही.
