प्रतिनिधी, चंद्रपूर : वर्धा नदीत जाणारा नाला अवरुद्ध झाल्याने कोसरसार गावात शिरले पाणी, जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात संततधार ठरली संकट, कोसरसार गावातील ग्रामपंचायत-आठवडी बाजार आणि स्मशानभूमी पाण्याखाली, वारंवार निवेदने देऊनही नाल्याचे खोलीकरण झाले नसल्याने गावातल्या सखल भागात शिरले पुराचे पाणी, तहसील प्रशासनाने घटनेची दखल घेत पथक केले रवाना, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाच्या दमदार हजेरीने पाणीच पाणी चंद्रपूर जिल्ह्यात सततच्या पावसाने गावालगतच्या नाल्याला पूर आल्याने वर्धा नदीत जाणारा नाला अवरुद्ध होऊन कोसरसार गावात पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात काल रात्रीपासून पडत असलेली संततधार संकट ठरली आहे. कोसरसार गावातील ग्रामपंचायत-आठवडी बाजार आणि स्मशानभूमी पाण्याखाली आली आहे. ग्रामस्थांनीवारंवार निवेदने देऊनही नाल्याचे खोलीकरण झाले नसल्याने गावातल्या सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. तहसील प्रशासनाने घटनेची दखल घेत गावात पथक रवाना केले आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाच्या दमदार हजेरीने नदी नाल्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.
