जनतेज न्युज

नाशिक जिल्ह्यात नळ पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्राकडून 798 कोटीचा निधी

प्रतिनिधी, नाशिक :’हर घर जल,हर घर नल’ या योजनेसाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालय अंतर्गत नाशिक जिल्ह्याला 798 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून निधी प्रथमच मिळाल्याचे येवला येथे जलजीवन योजनेच्या कामाचे भूमिपूजनाप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी माहिती दिली यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे अध्यक्ष स्थानी होते. दुष्काळग्रस्त म्हणून येवला तालुक्याची ओळख असून या येवला तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त पुरस्कृत जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत येवला तालुक्यातील नांदूर या गावी नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन करण्यात आले यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार बोलत असताना त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 798 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे हा इतका मोठा निधी प्रथमच नाशिक जिल्ह्यासाठी मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गाव वाड्या वस्त्यांपर्यंत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे अनेक ठिकाणी गाव वाड्या वस्त्यांपर्यंत पाणीपुरवठा सुरू झाला आहे यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे पाण्यासाठी होणारी हेळसांड ही थांबणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय जनशक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंद्र शेखावत यांचे आभार यानिमित्ताने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुप आभार की त्यांनी ही योजना काढली. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी पहिल्यांदा नाशिक जिल्ह्याला मिळाला आहे की, जो पाण्यासाठी, गाव, खेड्या-पाड्यापर्यंत ही योजना पोहोचली आहे. भारतामध्ये एक ऐतिहासिक निर्णय झाला आहे. एक आदिवासी समजातील महिला द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली आहे. हा विचार ही माझ्यासारख्या एका आदिवासी महिलेने केला नव्हता की आमच्यातली एक भगिनीमाता देशाची राष्ट्रपती सुध्दा होऊ शकते.