जनतेज न्युज

लहानग्या वारकऱ्यांची पायी दिंडी

प्रतिनिधी, बीड : आपल्या लाडक्या विठूरायाला भेटण्याची ओढ समस्त वारकऱ्यांना लागलीय. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यात. याच दिंडी मधील अनुभव लहान चिमुकल्यांना देखील घेता यावा याकरिता बीडच्या धानोरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने अनोखा उपक्रम हाती घेतला. यावेळी जिल्हा परिषदेची शाळा ते गावातील विठ्ठल मंदिर या मार्गावरून दिंडीचे आयोजन करण्यात आलं. दिंडीमध्ये विठू नामाचा गजर करत या लहानग्या वारकर्‍यांनी सहभाग घेतला. दरम्यान या दिंडीत पालकांबरोबरच शिक्षक देखील सहभागी झाले होते. यावेळी फुगडीचे रिंगण करत सर्वांनी दिंडीचा अनुभव घेतला आहे.