समोर जावं लागतं, अशी खंत पिंपरी चिंचवड येथील आनंदघन वृद्धाश्रमाच्या संचालिकां निशाताई रसाळ यांनी व्यक्त केली आहे.
प्रतिनिधी , पुणे : कुटूंबाने त्यागून दिलेल्या वयोवृद्धांना आम्ही आमच्या वृद्धाश्रमात सांभाळतो, जिवंतपनी त्यांच्या कुटुंबा कडून हालअपेष्टा होत असतात मात्र मेल्यानंतरही प्रशासना कडून अशा प्रकारच्या हालअपेष्टा सुरूच असतात अशी खंत निशाताई रसाळ यांनी व्यक्त केली आहे. वृद्धाश्रमात राहणाऱ्या वयोवृद्धांच नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वर लगेच अंत्यसंस्कार करण्या ऐवजी त्यांचं मृतदेह जवळपास 4 दिवस डेड हाऊस मध्ये स्टोर करून ठेवण्यात येते. त्यामुळे त्यांच्या मृतदेहावर अंतीमसंस्कर करण्यासाठी वृद्धाश्रमाला चार दिवस वाट पाहावी लागते. चार दिवस डेड हाऊस मध्ये बॉडी कुजू लागल्यानंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याची परवानगी वृद्धाश्रमाला देण्यात येते. ही गोष्ट क्लेशदायक असून शासनाने या नियमात बदल करायाला हवं अशी मागणी आनंदघन वृद्धाश्रमाच्या संचालिका निशाताई रसाळ यांनी केली आहे. आम्ही शासना कडून कोणतंही अनुदान न घेता अगदी मोफत या अनाथ वृद्ध व्यक्तींना सांभाळतो मात्र या व्यक्ती वर जेव्ह आम्ही शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी घेऊन जातो तेव्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ देखिल क्षणोक्षणी वृद्धाश्रम चालविणाऱ्या कडे पैश्याच्या मागणीसाठी तगादा लावत असतात. हे कुठेतरी थांबायला हवं. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धासाठी थोडीतरी सहानुभूती दाखवायला हवी शासनाने यासाठी कायदा करायला हवा अशी मागणी निशाताई रसाळ यांनी केली आहे.
.
