जनतेज न्युज

जो पर्यंत जमिनीमध्ये 65 मिलिमीटर पर्यंत ओलावा होत नाही तो पर्यंत पेरणीची घाई करू नये – डॉ. रामचंद्र साबळे

प्रतिनिधी, पुणे : राज्यात पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरी राज्यात अनेक भागात पाऊसाने दांडी मारली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या तरी उर्वरित राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. तर पावसाने दांडी मारलेल्या भागात पेरण्या संकटात आल्या आहेत.अश्यातच राज्यात पाऊसाचा प्रमाण हा 15 जुलै पर्यंत असाच असणार असून राज्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. असं मत हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलं. मार्च,एप्रिल,मे महिन्यात वाऱ्याचा जो वेग नोंदवला गेला आहे. तो वेग दीड दोन किलोमीटर असा नोंदवला गेला आहे. जेव्हा अस वाऱ्याचा वेग असतो. तेव्हा पाऊसाला रस्ता नीट मिळत नाही.हवेचे दाब जर जास्त असेल तर तेव्हा वाऱ्याचा वेग कमी होतो.आणि जून महिन्यात जो पाऊसाचा खंड निर्माण झाला आहे. त्याला हेच मुख्य कारण असल्याचं यावेळी साबळे यांनी सांगितल.