जनतेज न्युज

झारगडवाडीत ऊसाला लागली आग.. आगीत ठिबक सिंचन सह लाखो रुपयांचे नुकसान..

दोन दिवसांत ऊसाला आग लागण्याची ही बारामती तालुक्यातील दुसरी घटना..
प्रतिनिधी , बारामती : बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे आज दुपारी ऊसाला अचानक आग लागली.. या लागलेल्या आगीत १५ एकर ऊस जळून खाक झालाय.. दुपारी अचानक ऊसाला आग लागली वाऱ्याचा जोर असल्यानं या आगीत तब्बल १५ एकर ऊस जळालाय.. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.. मात्र शेतकऱ्यांचं यात मोठं नुकसान झालंय.. अग्निशाक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती.. मात्र आग नियंत्रणात येईपर्यंत 15 एकर ऊस आगीच्या भक्ष्य स्थानी गेला.. यात दहा शेतकऱ्यांचे मिळून ठिबक सिंचनसह 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अचानक आग लागत असल्याने शेतकरी मक्तर हतबल झाला आहे..