जनतेज न्युज

झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या महिला आघाडी नामफलकाचे अनावरण

प्रतिनिधी : पुणे , माता रमाई आंबेडकर झोपडपट्टी येथील कष्टकरी महिला संघटित होऊन हडपसर औदयोगिक वसाहत जवळील शिंदे वस्ती येथे झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या महिला आघाडीच्या नामफलकाचे अनावरण भगवानराव वैराट यांच्याहस्ते करण्यात आले .
यावेळी भगवानराव वैराट यांनी सांगितले कि , कष्टकरी महिलांच्या तीन दगडावर चुली संसार थाटला असून त्यांची जिद्द हि माता रमाई आंबेडकरांच्या विचार सरणीची असल्याने पती साथ देउन संसाराचा गाडा पुढे नेलाअसल्याचा स्वाभिमान आहेत . त्याचे घरकुलाचे स्वप्न निश्चित संघटनाच्या पुढाकाऱ्याने करणार आहे , असे विचार मांडले .
याप्रसंगी पुणे शहर झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या अध्यक्षा सुरेखा भालेराव , दत्ता कांबळे , गणेश लांडगे , सतीश कांबळे , मोहम्मद शेख , कांताबाई कांबळे , पंडित लांडगे , ज्योती कांबळे , मंदाकीनी घाडगे , महादेव काळे , भारती सिहं , रघु पवार , भीमू पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.