प्रतिनिधी , मुंबई : “टाटांच्या हॉटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने “बीएसई” वर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या ताज हॉटेलला सूट देण्याच्या निर्णयावरुन आशिष शेलार यांनी शिवसेनेला ही तर “वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!”, अशी टीका केली आहे. “महापालिकेची कंत्राटं मुलाला आणि जावयाला तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???” असा सवाल शेलार यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे.
