प्रतिनिधी , बीड : पवित्र पोर्टल च्या माध्यमातून राज्यामध्ये बारा हजार शिक्षकांची पदभरती होणार होती यामध्ये जवळजवळ सहा हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या मात्र कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ लागल्याने शिक्षक भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती नंतर भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी याकरीता डीएड बीएड स्टुडन्ट असोसिएशन कडुन पायी दिंडी आंदोलन करत स्थगिती उठवून भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती अखेर या मागणीला यश आले आहे ३ डिसेंबर रोजी च्या बैठकीतील निर्णयानुसार शिक्षक भरतीला परवानगी देत त्यावरील बंदी उठविण्यात आली आहे त्यामुळे अनेक डीएड बीएड धारकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे तसेच डीएड, बीएड स्टुडन्ट असोसिएशन कडुन या निर्णयाचे स्वागत देखील करण्यात आले.
