प्रतिनिधी, अहमदनगर : रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानुन सेवाभावी वृत्ती ठेवावी लागते. डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांनी केल्या भावना व्यक्त रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानून सेवाभावी वृत्ती ठेवावी. ज्यामुळे डॉक्टरांचा रुग्णाविषयी आणि रुग्णांचा डॉक्टरांविषयी आदरभाव राहील. असे प्रतिपादन डॉक्टर दिना निमित्त डॉ ज्ञानेश्वर दराडे, डॉ सुभाष देशमुख, डॉ अश्रूबा जायभाये यांनी केले. रुग्णांवर प्रामाणिकपणे केलेले उपचार त्यातून त्यांना त्यांच्या आरोग्याला मिळणारी प्रतिकार क्षमता हे डॉक्टरांच्या केलेल्या रुग्णसेवेचे प्रतीक आहे. हेच सामाजिक बांधिलकी प्रत्येक डॉक्टरांनी रुग्णांविषयी दाखवली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
