जनतेज न्युज

भाजपच्या पाठिंब्याने मुख्यामंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान; भाजप कार्यकर्त्याच्या जल्लोष

प्रतिनिधी, ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेल्या बंडावर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर पूर्णविराम लागला . शिंदे गटाला बीजेपीने पाठिंबे दिल्याने एकनाथ शिंदे याची मुख्यमंत्री पदाची वर्णी लागली, तर उपमुख्यमंत्री पदावर भाजपच्या देवेंद्र फडणवीस याची निवड झाल्याने महाराष्ट्रभर कार्यकर्त्यानि जल्लोष साजरा केलेला पाहायला मिळाला , ठाण्यातील भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालया बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत ढोलताशाच्या गजरात जल्लोष साजरा केला यावेळी भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या सह भाजपा महिला आघाडी व भाजपा युवामोर्च्या चे पदाधिकारी उपस्तित होते