जनतेज न्युज

डोंबिवलीत माचीस काड्यांपासून साकारले छत्रपती शिवाजी महाराज….

प्रतिनिधी , डोंबिवलीतील : कलाकार श्रद्धा पाटील हिने छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य दिव्य अप्रतिम अशी प्रतिमा चक्क माचीस काड्यांपासून साकारली आहे. 36 तासांत 19 हजार 800 काड्यांचा वापर करून ही प्रतिमा साकारली.येत्या फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.केवळ जयंतीला महाराजांची आठवण न काढता इतर वेळेस पण त्यांचा जयजयकार आपण केला पाहिजे, त्यांना एक मानवंदना म्हणून येथील सांगावेश्वर मंदिरात ही 10 बाय 10 फुटांची प्रतिमा साकारली आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न असून यापेक्षा मोठ्या आकारातील प्रतिमा साकारण्याचे माझं लक्ष असल्याचे श्रद्धाने सांगितले. या कामात श्रद्धाला फक्तराजे प्रतीष्ठाण डोंबिवली व सागावेश्वर मीत्रमंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले