प्रतिनिधी , कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद होत्या मात्र आज राज्य शासनाच्या निर्देशानुसार पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू झाले आहे ,अमरावती जिल्ह्यातील ५ वी ८ वी पर्यंत च्या 670 शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिवाजी बहुउद्देशीय विद्यालयात विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आला. सुरुवातीला विद्यार्थ्यांच तापमान मोजण्यात आले,हातावर sanitayzer देण्यात आले. अमरावती जिल्ह्यात एक लाख 77 हजार 821 विद्यार्थी आजपासून शाळेत दाखल होणार आहे त्यामध्ये 1974 योगशिक्षक या विद्यार्थ्यांना तब्बल दहा महिन्यानंतर आपल्या क्लासरूममध्ये पुन्हा एकदा शिकविणार आहे
