प्रतिनिधी, कल्याण : मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर एकीकडे शिवसैनिकांनी वेट अन्ड वाचची भूमिका घेतलेली असतानाच आता शिंदे समर्थक शिवसैनिकांनी समर्थनाचे बॅनर लावले आहेत.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेच्या गोटात शांतता पसरली होती मात्र आता डोंबिवलीत काही दिवसापूर्वी मनसे मधून शिवसेनेत आलेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे, दीपक भोसले, राजेश मुणगेकर या चार शिवसैनिकानी डोंबिवलीत बॅनरद्वारे एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिलेले ब्यानार लावले आहे या बॅनर वर
“लोकांचा लोकनाथ एकनाथ शिवसेनाप्रमुख स्व . बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन जाणारे
मा . श्री . एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा ! साहेब आगे बढो , हम आपके साथ है !असे लिहून होर्डिंग्ज लावत एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे
