प्रतिनिधी, नांदेड : शिवसेनेकडून आंदोलन होण्याची शक्यता असल्याने हा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, भाजप चे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि भाजपचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे नांदेड उत्तर चे बालाजी कल्याणकर यांचा मोबाईल काल पासून नाॅटरिचेबल आहे.त्यामुळे कल्याणकर कुठे आहेत याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. कल्याणकर यांच्या घरासमोर मात्र, शुकशुकाट दिसून येत आहे. कुटूंबियांनी देखील कल्याणकर कुठे आहेत हे माहीत नसल्याचे सांगत आहेत.
