प्रतिनिधी, जळगाव : मुक्ताईनगर चे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे विधान परिषदेचे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज पहाटे मुक्ताईनगर येथील घरी आले होते.त्यानंतर ते फोन आल्यामुळे तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती त्यांच्या सौभाग्यवती यामिनी पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले असून एका एका आमदारांच्या मताला खूप मोठी किंमत मानली जात आहे.आज मुक्ताईनगर चे अपक्ष आमदार विधान परिषदेचे निवडणूक संपल्यानंतर मुलाची तब्येत बिघडल्यामुळे पहाटे घरी पोचले होते ,त्यानंतर त्यांना तात्काळ फोन आल्यामुळे पुन्हा ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती त्यांच्या सौभाग्यवती यांनी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
