जनतेज न्युज

डोणगाव ग्रामपंचायत येथे विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी, बुलडाणा : पंतप्रधान आवास, रमाई आवास, शबरी आवास योजनेच्या प्रपत्र ‘ड’ मध्ये सुटलेले पात्र लाभार्थी यांची पुरवणी यादी तयार करावी.. घरकुल योजनेत मंजूर घरकुलाची काम तात्काळ करण्यात यावी. ना दुरुस्त हातपंप त्वरित दुरुस्त करण्यात यावे. या अन्य मागण्या सह आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने डोणगाव ग्रामपंचायत येथे नागरिकांसह स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामपंचायत वर धडक देत आंदोलन करुन विविध मागण्यासंदर्भात ठाम भूमिका घेतल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन हादरून गेले होते. संबंधित वरिष्ठ प्रशासनासोबत दूरध्वनीवर चर्चा केली असता पंचायत समिती स्तरावरून विस्तार अधिकारी ग्रामपंचायत श्री सोनुने व विस्तार अधिकारी श्री पंडागळे हे आंदोलन स्थळी दाखल झाले व आंदोलन कर्त्याशी विविध विषयावर चर्चा करून त्यांनी केलेल्या मागण्या मंजूर करत आजच याबाबत तातडीने पत्र काढून खाते स्वाक्षरी मंजुरीसाठी सुद्धा आमच्या स्तरावरुन आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.