प्रतिनिधी , यवतमाळ : अवैधरीत्या होणार्या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार व तलाठ्यावर वाळूमाफियांसह गुंडांनी हल्ला केला. या घटनेला सहा दिवस होत असतानाही मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. त्यामुळे अधिक संतप्त झालेल्या तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेनेतिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन केले.
वाळूमाफिया तथा कुख्यात गुंड अविनाश चव्हाण याने नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्याला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे अटकेच्या मागणीसह मकोका (संघटित गुन्हेगारी कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आहे. आतापर्यंत त्याला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन केले. लवकरच पुढील आंदोलनाची भूमिका देखील ठरविण्यात येणार आहे.
