जनतेज न्युज

तीन वर्ष झाले तरी डॉ. बाबासाहेबांचं स्मारक कागदावरच

प्रतिनिधी, मुंबई : बी. आय. टी. चाळ, परळ बावीस वर्षे जिथे बाबासाहेबांचं वास्तव्य होतं आणि सर्व चळवळीचं जे प्रमुख स्थान होतं तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे.

ज्या काही बाबी आणि अडथळे आहेत त्या लवकरात लवकर दूर करावे. आणि आणखी एक मागणी अशी की, तिथले जे स्थायिक आहेत त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि त्यांचं त्याठिकाणी पुनर्वसन व्हावं

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे बहुजन समाजाचं स्मृती केंद्र राहील, म्हणून आम्ही राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावं अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.