जनतेज न्युज

तेजापूर गावामधील रस्त्याची लागली वाट : सिमेंट रोड बनवून देण्याची मागणी

प्रतिनिधी ,यवतमाळ : झरी तालुक्यातील मुकुटंबनपासून दहा ते बारा किलोमीटर अंतर असलेल्या तेजापूर गावामध्ये रस्त्यांची वाट लागली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या गावांमध्ये रोडचा पत्ताच नसल्याचे दिसून येत आहे.वार्ड क्र.दोन मधील रस्ते जणू पांदण रस्त्याचे स्वरूप आले आहे.त्या रस्त्याने शाळकरी मुले,वयोवृद्ध नागरिक,मोठ्या प्रमाणात महिला पाणी पाणी भरण्यासाठी येतात. ग्रामपंचायतमधील सरपंच, सचिव व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पाहणी करून सिमेंट रस्ता बनवून देण्याची मागणी तेजापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.