जनतेज न्युज

त्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली मनसेने ; पीपीई किटचेही वाटप

प्रतिनिधी , यवतमाळ : कोरोना आणि इतर आजाराने मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वीकारली आहे. त्यांच्याकडून पीपीई किटचेदेखील वाटप करण्यात येत आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकांकडे पैसा नाही. अशा अडचणीत मनसेने मदतीसाठी हात पुढे केला आहे. कोणत्याही प्रकारच्या आजाराने आणि कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मनसेने घेतली आहे. जिल्हा प्रशासनाला त्यांनी एक हजार पीपीई किट दिल्या. नगर परिषद आणि नातेवाईकाना एकूण दीड हजार पीपीई किटचे वाटप केले. कोरोना अथवा संकट काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांच्या मदतीसाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही मनवीसे जिल्हा अध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी दिली.