प्रतिनिधी, औरंगाबाद : आज गुरुवार 17 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद शहरातील मलान प्लाजा विष्णुनगर येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली की, औरंगाबाद उच्च न्यायालयात दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यात यावी किंवा दोन महिने पुढे ढकलण्यात यावी अशी विद्यार्थ्यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.गेल्या काही दिवसापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले होते यावेळी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यात यावी किंवा सदरील परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती असे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले होते, मात्र यावरती कोणत्याच प्रकारचा निर्णय न घेतल्याने,विद्यार्थ्यांनी न्यायालयाचे दार ठोकले असून विद्यार्थ्यांच्या वतीने जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.सदरील जनहित याचिका मध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने दोन मागण्या करण्यात आले असुन पहिली मागणी सदरील परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावी किंवा विद्यार्थ्यांना दोन महिन्याचा कालावधी अभ्यासासाठी देण्यात यावा.अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत आज रोजी देण्यात आली आहे.
