रोजगाराच नुकसान होऊ नये याची दक्षता
राऊत यांनी मॅच सुरू केली आता पुढची बॅटिंग बघू
प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली मधील विविध विकास कामांचा आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं . याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोव्हिड सारख्या कठीण काळात देखील या ठिकाणी रस्त्याचे काम असेल पुलाचे काम असतील ते सुरू होते,एकंदरीतच पूर्ण एम एम आर रिजनचे विकास करणे हे आमचे ध्येय आणि धोरण असल्याचे सांगितले .
-ड्रीम प्रोजेक्ट्स ला विरोध नाही, वन वाचवण्यासाठी काय प्रयन्त करता येईल त्याचा विचार करतोय – आदित्य ठाकरे
नागपूर-अजनी वन प्रकल्पाला पर्यावरन वाद्यांनी विरोध केला आहे .हा प्रकल्प केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्त आहे .पर्यावरणवाद्यांना आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे .याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी या प्रोजेक्ट ला वैयक्तिक विरोध नाही मात्र नागपूरकरांच्या व्यथा मांडल्या,ड्रीम प्रोजेक्ट्स ला विरोध नाही,वन वाचवण्यासाठी काय प्रयन्त करता येईल त्याचा विचार करतोय अस सांगितलं .
डोंबिवली एम आय डी सी मधील 156 कंपन्या स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारणे घेतलाय .उद्योजकांनी याबाबत विरोध केला आहे .याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी कुठेही रोजगाराच नुकसान होऊ नये याची दक्षता आम्ही घेत आहोत ,प्रदूषण होतय त्यामुळे जिथे रेड इंडस्ट्रीसाठी जागा आहे तिथे स्थलांतर करन्यात येत आहे ,तिथे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आणि रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल
-राऊत यांनी मॅच सुरू केली आता पुढची बॅटिंग बघू
संजय राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषेदेत किरीट सोमैय्या यांच्यावर आरोप करत वसइ येथील कंपण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल .याबाबत
आदित्य ठाकरे यांनी राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे आता पुढची बॅटिंग बघू अशी प्रतिक्रिया दिली आहे
