प्रतिनिधी , दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले त्याच्या भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो असे खासदार व राष्ट्रीय प्रवक्ता हीनाताई गावित यांनी सांगितले… शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या बसवून शांत मार्गाने सोडवल्या जातील परंतु असं हिंसक आंदोलन करून कोणास वेठीस धरू नये. दिल्ली येथील आंदोलनात महिला पोलीस तसेच पोलिस कर्मचाऱ्यांवर हमले करण्यात आले हे अत्यंत निंदनीय असून हे देशाला काळिमा फासणारे आहे आणि एवढं सगळं घटना झाली असताना विरोधकांनी देखील या आंदोलनाच्या निषेध व्यक्त करायला हवा होता परंतु विरोधकांनी तसे न केल्यामुळे विरोधक या आंदोनलाला समर्थन देत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत….
