जनतेज न्युज

दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे तुमच्याकडे उत्तर नाही, म्हणून भाजपवाले गल्लीबोळात यात्रा काढत आहेत-जयंत पाटील .

प्रतिनिधी : सांगली : भाजपने काढलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा नुकताच समारोप सोहळा सांगलीत पार पडला.या आत्मनिर्भर यात्रेवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी खुमासदार शैलीत टीका केली आहे.
महाराष्ट्र आणि देशात यात्रा काढायच्या आधी दिल्लीत तुमच्या दारात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांशी बोला, त्यांना हा कायदा कसा चांगला आहे हे पटवुन द्या, शेतकऱ्यांना जर पटले तर उपोषणाला बसलेले शेतकरी परत जातील,असे मत जयंत पाटील यांनी मांडले आहे.दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे तुमच्याकडे उत्तर नाही, म्हणून भाजपवाले गल्लीबोळात यात्रा काढत आहेत,असा टोलाही यावेळी जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.