जनतेज न्युज

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचीत बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन.

प्रतिनिधी , जालना : सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलं.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.धरणे आंदोलना दरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध नोंदवला.केंद्र सरकारने केलेले शेतकरी कायदे रद्द करावे,रेल्वेचे खाजगीकरण करु नये.शिवाय लोकशाहीला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविता मुंढे यांनी म्हटलंय.