जनतेज न्युज

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचितचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

प्रतिनिधी ,जालना – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत असुन केंद्र सरकार केलेले तीनही कृषी कायदे रद्द करायला तयार नाही. त्यामुळे पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. या आंदोलनात वंचितचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला.